Tuesday, April 3, 2007

मी सोडून सारी लाज

मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज
की घुंगरु तुटले रे, की घुंगरु तुटले रे!!!

बहरली वीज देहांत, उतरले प्राण पायांत
वार्‍याचा धरुनी हात, अशी बेभान नाचले आज
की घुंगरु तुटले रे, की घुंगरु तुटले रे!!!

मन वेडे तेथे जाय, ते जवळी होते हाय
अर्ध्यात लचकला पाय, तरी बेभान नाचले आज
की घुंगरु तुटले रे, की घुंगरु तुटले रे !!!

No comments: